Posts

नंदी नसलेले कपालेश्वर मंदिर .........            नाशिकची धार्मिक ओळख मानल्या जाणाऱ्या रामकुंडापाठोपाठ श्री कपालेश्वराचं नाव घेतलं जातं. श्रीविष्णुंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याने ,  श्री कपालेश्वर दर्शनातून बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचं पुण्य लाभतं असं मानलं जातं. विशेष म्हणजे ,  नंदी नसलेलं महादेवाचं देशभरातलं एकमेव मंदिर असावं. श्रावण महिन्यात कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते.                      नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात नंदी का नाही याचीही पुराणात एक कथा आहे. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व शंकर यांमधे वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणार्‍या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून म...